आजच्या या कार्यशाळेत या बैठकित आपणं एक पण घेऊया की आपल्या मतदारसंघातील प्रत्येक संस्थेवर भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येईल व आपला पक्ष सक्षम होईल.- श्री.रविराजजी देशमुख महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष.
माझ्या राजकीय जीवनात ३० ते ३५ वर्षाच्या कार्यकाळात जो निधी मी कधी बघितला नाही तो या २ ते ३ वर्षात बघितला आणि हे शक्य झाले जनतेच्या आशीर्वादाने व तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांने तेव्हा प्रतापदादा सारखा आमदार आपल्याला परत हवा आहे जो फक्त विकासाचे राजकारण करतो.- श्री.मोहन इंगळे
भाऊंच्या विकास धोरणाचे प्रतीबिंब आमदार प्रतापदादा अडसड यांच्या विकास कार्यातून दिसून येते.- श्री.रामदासजी निस्ताने माजी जिल्हा परिषद सभापती
जुना धामणगाव येथील बालाजी मंगलम येथे धामणगाव रेल्वे भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर कार्यकारणी बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड, प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष रविराजजी देशमुख, धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोठे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष विठ्ठलरावजी राळेकर, पंचायत समिती सदस्य राजकुमारजी केला, पंचायत समिती सदस्य नरेंद्रजी रामावत, माजी जिल्हा परिषद सभापती रामदासजी निस्ताने, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मोहनभाऊ इंगळे, भाजपा धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष मनोजभाऊ डहाके, भाजपा धामणगाव रेल्वे शहर अध्यक्ष मोहनभाऊ गावंडे, भाजपा चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष बबनरावजी गावंडे, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष शोभाताई हीवसे, वनिताताई राऊत, उषाताई तिनखेडे, नलिनीताई मेश्राम, जयंतभाऊ बमनोटे, दाभाडेजी, पवनजी पडोळे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, निवृत्तीभाऊ लोखंडे भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष, विलास भाऊ बुटले, अशोक भाऊ शर्मा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BJP4Maharashtra #bjp4india #BJPGovt #devendrafadnavis #BhartiyaJantaParty #JPNadda #NitinGadkariJi #CMOMaharashtra #miaknathshinde #NitinGadkari प्रताप अरूणभाऊ अडसड Archana Adsad-Rothe