प्रतिनीधी/अमरावती
भातकुली तालुक्यातील वडाळा पुनर्वसन ते जसापुर व इतर शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची गेल्या १० ते १५ पूर्वीपासूनच दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याचे खडीकरण अथवा डांबरीकरण आतापर्यंत होणे गरजेचे होते. राजकीय उदासीनता अथवा प्रशासकीय अनास्थेमुळे या रस्त्याची समस्या आजही कायम आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून तर किमान फेब्रुवारी, मार्च उजाडेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे व पाण्याचे साम्राज्य असते. पेरणीच्या दिवसात शेतात खते, बियाणे घेऊन जाणेसुद्धा अवघड होते. तर हंगामात शेतकऱ्यांना शेतमाल घरीसुद्धा आणता येत नाही. सोयाबीनसारखे मुख्य पीकही काढणीनंतर शेतातच ठेवावे लागते. हा प्रकार प्रामुख्याने वडाळा पुनर्वसन ते जसापुर शिवाराकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर उपरोक्त कालावधीत दरवर्षी घडतो. पावसाळ्यात या पाणंद रस्त्यावर चिखल होत असल्याने शेतकऱ्यांची गुरे-ढोरे त्यामध्ये फसत असतात; मात्र तरीसुद्धा या रस्त्याची कामे करण्यासाठी प्रशासन धजावत नाही, हे फार दुर्दैवी आहे. शासकीय लालफितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्याग ‘शेत तिथे पांदण रस्ता’ या योजनेचा पार फज्जा उडाला आहे.
सदर परिसर भातकुली तालुक्यातील शासकीय योजणापासून वंचित असलेला दुर्गम भाग ..! लोकप्रतिनिधी इथे भरकटत नसल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात . अशातच शेतकऱ्याच्या पांदण रस्त्याच्या गैरसोय लक्षात घेता शासनाने ग्राम सडक योजने सारखे प्रकल्प अमलात आणण्याच्या प्रयत्न फोल ठरतांना दिसून येत आहे .या वडाळा पुनर्वसन ते जसापुर शेतीच्या वाटेवरील पांदण रस्त्याचे प्रस्तावित कामाला गेल्या दीड वर्षापासून मंजूरी मिळाली . वडाळा पुनर्वसन ते मोहाबाबा मंदिर चौक सा. क्र. ०/०० ते १/०० या अनुक्रमे ९३/SDO/2023 24 दि.३०/०६/२०२३ नुसार कामाची अंदाजे किंमत २४ लक्ष ८८ हजार असुन आतापर्यंत कामाला सुरवात होऊन पूर्ण होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु कंत्राटदाराचा मनमानी कारभार व राजकीय उदासीनतेमुळे कामाला कासवगतीचे स्वरूप प्राप्त झाले. व विचारणा केली असता काम पुर्ण झाल्याचे कंत्राटदाराकडून महिती मिळाली.तुलनेत कुठल्याच प्रकारचे निर्माण कार्य येथे दिसुन येत नसून सदर निर्माण कार्य फक्त कागदावरच शाहीस्वरुपी शोभेची वस्तू म्हणुन झळकत आहे.सदर मार्गावर कुठलेही नव निर्माण कार्य सुरू असून परिस्थिति ‘जैसे थे’ दिसून येत आहे. अशातच कंत्राटदाराचे काम संशयास्पद दिसून येत आहे . सदर निर्माण कार्याबद्दल स्थानिकांनी कंत्राटदाराला विचारणा केली असता कंत्राटदार मुजोरीने वागणूक देत असल्याचे लक्षात आले . सर्व पर्याय निघून गेल्यावर नागरिकांनी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांना वास्तविकता मांडल्यावर नितीन कदम यांनी रस्त्याची पाहणी केली व रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरवात करावी अथवा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याचे आवाहन शासनाला केले आहे.
यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम, तालुका प्रमुख परेश मोहोळ, शहर प्रमुख प्रफुल महल्ले, राजाभाऊ वानखडे,मंगेश वानखडे, शेषराव शिरसाठ, पिंटू भांडे, मयूर वानखडे, मंगेश ठाकरे,विनोद वानखडे,तुषार वानखडे व संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.