अमरावती, दि. 27 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवार दि. 28 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.
दौऱ्यानुसार] श्री. बावनकुळे शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांचा जीवन गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी येथे पोलीस पाटील परिषद व अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता बसस्टॅंड ते रेल्वे स्टेशन रोड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण आणि ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे भेट देतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता सध्दम्म बुध्द विहार, मार्डी रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्राचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. सोयीने सायंकाळी 5 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवात भर टाकणाऱ्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित राहतील. खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी राहतील. खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, उपस्थित राहतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र उपस्थित राहतील.
या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय सहायक संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी, उपअभियंता श्रीकृष्ण गोमकाळे यांनी केले आहे.















