विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करावे… कमल छांगाणी

0
36
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेतांना सोबतच आपले आदर्श राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज,हुतात्मा भगतसिंग राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बाबू गेनू, अशपाक उल्ला खान सह शहिदांचे आचार, विचार, आचरणात व कृतित आणावे ते म्हणाले विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आत्मसात करावे ते संत बगाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे येथे आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाचे व्हिडिओ द्वारे ऑनलाइन उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अरुणभाऊ अडसड, आयएमसी अध्यक्ष हेमंत जाधव,आयएमसी‌ अजय (बंटी)ठाकूर,प्रशांत मुन,आंनद झामरे,श्रीकांत पर्बत, सह मनोज डहाके, बबलू खैरकार,प्रणय राजनकर,दर्शन राठी, सौ.उषाताई तिनखेडे, सौ.नलिनीताई मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख वक्ते छांगाणी आपल्या उद्बोधनात म्हणाले की, स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय यज्ञात आपल्या पुत्रांची आहुती आणि बलिदान देणाऱ्या माँ साहेब जिजाऊ व भगतसिंगांची आई विद्यावती सह हुतात्म्यांच्या मातांना कोटी कोटी नमन याप्रसंगी छांगाणी यांनी माँ साहेब जिजाऊंनी छत्रपतींना शिकवलेल्या ज्ञान,चारित्र्य, एकता, राष्ट्रीयता, पराक्रमाची गाथा उपस्थितांसमोर मांडली त्यांनी नागरिकत्व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार प्रसार, सामाजिक समरसता व पर्यावरण संरक्षण या पंच परिवर्तन विषयावर सुद्धा उद्बोधन केले ते म्हणाले की जयचंद आणि गंगू सारख्या गद्दार यांच्यावर लक्ष देणे आवश्यक आहे त्यांनी गुरुगोविंद सिंहाच्या पुत्रांच्या बलिदानाची हुतात्मा भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याची सत्यता विशद केली या कार्यक्रमांची संकल्पना राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची होती.

संचालन शैलेंद्र गणवीर यांनी केले यावेळी आमदार प्रताप अडसड यावेळी आमदार अडसड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे, महापुरुषाचे चरित्र वाचा त्यांचा त्याग, समर्पण समजून घ्या, त्यांचे कार्य वाचन केल्याने येणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल याप्रसंगी आय एम सी अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विचार व्यक्त प्रास्ताविक प्राचार्य पि. एच.धोटे यांनी व आभार प्रिया काळे यांनी
मानलेत कार्यक्रमांच्या आयोजनासाठी संस्थेचे शिक्षक वर्ग विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad