अमरावती (प्रतिनिधी):
जळगाव मंगरूळ येथील विद्यार्थिनी दीपिका राजेंद्र बावनगडे हिला अमरावती येथे अँग्री अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असला तरी वसतिगृह प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे तिच्या पालकांनी समाजकल्याण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
उपोषणाची माहिती मिळताच गावाचे सरपंच मनोज मधुकर शिवणकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष यांनी उपोषण मंडपात भेट देऊन पालकांना पाठींबा दिला. शिक्षण हा मुलभूत हक्क असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.