त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती महोत्सवाचे धामणगाव रेल्वे येथे आयोजन विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित! 

0
34
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी 

भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त्याने दरवर्षी प्रमाणे यंदाही संविधान रक्षक जय संविधान सन्मान ग्रुप धामणगाव रेल्वे च्या वतिने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी ला, सांय 

४ वाजता पासून आयोजन केले आहे ,या मध्ये भंत्ते डॉ अभय बोधी यांच्या हस्ते बुद्ध वंदना व धम्म प्रवचन , चलो बुध्द की ओर डान्स ग्रुप, नंतर अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे व्याख्यान विषय अनुसूचित जातीवर झालेल्या अन्यायावर आयोगाची भूमिका, सुनील किटकरू यांच्या विषय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भारतीय समाज त्या नंतर बुद्ध भिम गिंताचा महासंग्राम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार संविधान मनोहरे व दिपाली इंगळे यांच्या दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत मुन अध्यक्ष संविधान रक्षक जय संविधान सन्मान ग्रुप धामणगाव रेल्वे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन , समाजातील विविध सामाजिक संस्था व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी चा मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येईल आहे या कार्यक्रमाचा लाभ समस्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रवि उर्फ दादू मेश्राम, प्रेम मोटघरे, सिध्दार्थ टाले, सदानंद कांबळे, भिमराव सहारे, अल्पेश बनसोड, राहुल भगत, आकाश मुन, इरफान अली, सेन्हल वानखडे, सीमा मुन, दिपाली जाधव, प्रनिता टाले, माधवी सावध, अरुणा भिल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली

veer nayak

Google Ad