वंचित बहुजन आघाडीचा नगरपरिषद निवडणुकीत विजय निश्चित !

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

यवतमाळ लोकनायक वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रभर वंचिताच्या आणि बहुजनांच्या प्रश्नाला हात घालून अन्यायाच्या विरोधात सातत्यपूर्ण लढे उभारल्यामुळे वंचितची प्रतिष्ठा संपूर्ण महाराष्ट्रभर वाढलेली आहे. त्याचा परिणाम नगरपरिषद निवडणुकीत निश्चितपणे दिसून येणार आहे.या वेळेस नगरपरिषद निवडणुक शहरातील बुद्धीवादी व फुले आंबेडकरवादी मंडळीने हाती घेतली असून वंचित बहुजन आघाडीला निवडून आणण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे. त्यामुळे निश्चितपणाने या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरा शिवाय दलित चळवळीला अन्य कोणताही चेहरा शिल्लक राहिला नसल्यामुळे संपूर्ण बौद्ध ,आदिवासी आणि ओबीसी बांधव हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून नगरपालिकेची सत्तापरंपरा निश्चितपणाने उलथवून टाकणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.सर्वसामान्य मतदार वंचित बहुजन आघाडीचा प्रचार जोमाने करीत असून सर्व शक्तीनिशी उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचार कार्याला लागले आहेत. वार्डा- वार्डातील मतदार 20 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत असून दिनांक 21 ला वंचितच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आतुर झाले आहेत.

veer nayak

Google Ad