अमरावती, दि. 6 लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवार दि.8 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता विभागीय क्रिडा संकुल, मोर्शी रोड अमरावती येथील मैदानावर 5 हजार विद्यार्थी, नागरीक, युवा मतदारांची मानवी साखळी तयार करण्यात येतणार आहे. या उपक्रमामध्ये जास्तीत-जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अधिकारी, कर्मचारी यांनी मोठया संख्यने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.
मानवी साकळीच्या माध्यमातून मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क् बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी अधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्यात क्रिकेट स्पर्धा तसेच विविध नृत्य स्पर्धाचे सादरीकरण सुध्दा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन स्वीप नोडल अधिकारी डॉ.कैलास घोडके व त्यांच्या टीमव्दारे नियोजन केलेले आहे.













