उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन.

0
79
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

यावर्षीचा कार्यक्रम खत्री जिनिंग व प्रेसिंग मध्ये.

धामणगाव रेल्वे,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धामणगाव शाखेचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन उद्या अश्विन शु. १२ शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ ला सायंकाळी ६.१५ वा आयोजित करण्यात आलेला आहे 

उत्सवापूर्वी शहरातून स्वयंसेवकांचे पथसंचलन सुद्धा निघणार आहे

सततच्या पावसामुळे यावर्षी माहेश्वरी भवन च्या बाजूला असलेल्या खत्री जिनिंग व प्रेसिंग येथे संघाचा श्री विजयादशमी उत्सव संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक सुभेदार रामदास हाडे तर प्रमुख वक्ता म्हणून संघाचे प्रांत सह कार्यवाह अजय नवघरे,अकोला हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत 

धामणगाव नगर व परिसरातील संघप्रेमी मंडळींनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंतीक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धामणगाव नगर कार्यवाह चेतन जयप्रकाश पोळ यांनी केली आहे. याप्रसंगी आजच गणवेश धारी स्वयंसेवकांचे पथसंंचलन दुपारी ४.३० वाजता शिवाजी संघ स्थानावरून निघणार आहे.

veer nayak

Google Ad