धामणगाव रेल्वे
पायाचे दोन्ही बॉल गेल्याने चालता येत नाही संपूर्ण आयुष्य दिव्यांग झाले अशातच सर्व दवाखान्यात उपचार घेऊन दुरुस्त झाले नाही घरी आल्यानंतर शेवटचा आधार म्हणून आमदार प्रताप अडसड त्या रुग्णासाठी देवदूत ठरले सात लक्ष्याची शस्त्रक्रिया मुंबईत मोफत करण्यात आली आहे
कावली येथील संजय अशोक तीतरे वय ३५ वर्ष यांची आर्थिक स्थिती जेमतेम तारुण्यात दोन्ही पाय निकामी झाले पायाचे दोन्ही बॉल गेल्याने चालता येत नव्हते अमरावती, नागपूर येथे उपचार घेऊनही आराम न झाल्याने शेवटी त्रस्त होऊन घरीच पडून राहिल्या शिवाय पर्याय नाही एकीकडे घरचा कमावता पुरुष असा आजारी पडल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली दोन्ही पायावर शस्त्रक्रियेसाठी सात ते आठ लाख रुपये आणायचे कोठून असा प्रश्न कुटुंबांना सतावत होता अशातच गावातील काही भाजपा कार्यकर्त्यांनी या भागाचे आमदार प्रताप अडसड यांना संजय तीतरे यांच्या तब्येतीची माहिती दिली आ. प्रताप अडसड यांनी विलंब न करता दुसऱ्या दिवशी संजय च्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व आधार दिल लगेच मुंबई हॉस्पिटल ला कॉल करून माहिती दिली पाठ पुरावा करून जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे विना शुल्क ७ लाख रुपये खर्च लागणारे ऑपरेशन विनामूल्य करुन दिले.
आपल्या भागाचे आमदार आपल्यासाठी संकटात देवदूत ठरल्याने तीतरे कुटुंब व कावली ग्रामस्थांनी आमदार प्रताप अडसड यांचे आभार मानले आहे.