ग्रामीणमध्ये निलेश विश्वकर्मा यांना जबरदस्त प्रतिसाद नारीशक्तीनी हातात घेतला गॅस सिलेंडर

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चंदुर रेल्वे …वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची प्रचार एक्सप्रेस ग्रामीण भागात सुसाट वेगाने धावत आहे .प्रत्येक गावात त्यांचे आत्मीय स्वागत होत असून नारीशक्तीने तर हातात गॅस सिलेंडर घेऊन त्यांचे निवडणूक चिन्हाचा अभूतपूर्व पद्धतीने प्रचार सुरू केलेला आहे.


डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराचा झंजावात शिवनी, धानोरा माळी ,राजुरा ,बोरी या गावात दिसून पडला. शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर निलेश विश्वकर्मा आपली भूमिका स्पष्ट करत आहे .वंचित बहुजन आघाडी कडून आपली उमेदवारी का हे प्रत्येक मतदारांना पटवून सांगत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात आपली लढाई का ,विकास ग्रामीण भागात का पोहोचला नाही, आजही धामणगाव रेल्वे मतदार संघ मागासलेला का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते मतदारांना देत आहे. मतदारही त्यांच्या ओजस्वी आणि प्रभावी भाषणाने भारावून जात आहे .ग्रामीण भागात सुरू असलेल्या प्रचारा दरम्यान धानोरा माळी येथील किरण साळुंखे ,नंदू चोपडे ,विठोबा भगत ,अंकुश ढोबळे ,भास्कर गडलिंग, मानसिंग पवार, विशाल पवार, सुरेश साळवे ,धानोराचे मनोहर मेश्राम ,छोटू खान, दिलीप निंभोरकर, उमेश मेश्राम, शाम कमलकर ,राजेश मानकर, सुरज पिंपळकर, अब्दुल परवेज, मोहन ओके ,सतीश लोहकरे, गजानन दरवाई ,मंगेश कोरडे, सागर उभे कर मंगेश भलावी गजानन साळवे ,सुनील गुजर, भूषण रोहनकर, मोहन धानोरकर आदी प्रमुख कार्यकर्ता सहभागी होत आहे. डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची दिनचर्या सकाळ पासूनच मतदारांच्या आणि युवकांच्या गाठीभेटीने होत आहे, त्यानंतर ते नारीशक्तीचा आशीर्वाद घेतात

veer nayak

Google Ad