धामणगाव रेल्वे. संत भुजंग बाबा उर्फ चिंधे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुंजी ग्रामा मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमांमध्ये सकाळी दिंडी काढण्यात आली. दिंडीनंतर ग्रामगीताचार्य माऊली दास हनुमंत महाराज ठाकरे यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत शिंदे महाराज यांनी आयुष्यभर संत गाडगे महाराज यांच्या सोबत राहून संत गाडगेबाबांचा विचार समाजापर्यंत पोहोचावा यासाठी स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात भजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले .संत गाडगे महाराज यांची सात संघ आयुष्यभर केली आणि म्हणूनच संत पदाला गेलेले संत चिंदे महाराज यांची आज 22 वी पुण्यतिथी या 22व्या पुण्यतिथी निमित्ताने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे म्हणाले की संत खूप आहे जगामध्ये परंतु त् आज समाजामध्ये अंधश्रद्धा पसरविणारे भोंदू बाबा भरपूर आहे .

परंतु माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी आयुष्यभर कोणत्याही पैसा न घेता तन-मन-धनाने समाजाची सेवा केली यामध्ये संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यासारखे संत होणे नाही कारण आज समाजामध्ये पाहतोय आपण संतांचा महापूर आलेला आहे.त्याने अंधश्रद्धेचा वाढत आहे. परंतु खरा संत जर ओळखायचा असेल तर आज खऱ्या संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यासारख्या संतांची आवश्यकता आहे. ज्याने समाज प्रबोधन होईल सोबतच गाव जागृत होईल ग्रामगीतेच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन च्या माध्यमातून गावाच्या गाव जागृत केली त्याचप्रमाणे संत गाडगे महाराजांनी खराट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देऊन ग्राम विकसित करण्याचं कार्य केले. म्हणूनच अशा संतांची आवश्यकता आज जगाला आहे असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य माऊली दास हनुमंत ठाकरे यांनी केले ते पुढे म्हणाले की संत चिंधे महाराज यांच्या समाधी आपल्याला दिसते आहे परंतु उद्या ही समाधी भूवैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व जनतेने या समाधी स्थळाला भेट देऊन तन-मन-धनाने सहकार्य जर केले तर हे क्षेत्र अधिक चांगले होईल .या कार्यक्रमाला श्री संत चिंधे महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन फुल नाही फुलाची पाकळी तन-मन-धनाने सहकार्य केले कार्यक्रम उत्साह संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवंदना घेण्यात आली.












