धामणगाव रेल्वे,
मागील अनेक दिवसापासून विजेचे लपंडाव सतत पणे सुरू असून रविवारी सायंकाळी पाच पासून तर रात्री बारापर्यंत तर सोमवारी पहाटे ६ पासून दिवसभर शहरातील विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी बाबत जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे हीच अवस्था ग्रामीण भागात सुद्धा असल्यामुळे अधिकारी वर्ग हेतू पुरस्पर नागरिकांना त्रास देत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे? कारण विद्युत वितरण कंपनीने शहर व ग्रामीणचे कार्यालय धामणगाव शहरापासून ३ किलोमीटर दूरवर नारगावंडी येथे स्थानांतरित केले असल्यामुळे नागरिकांना तक्रार करणे सुद्धा तारेवरची कसरत झालेली आहे विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण करणार असल्याचे हिंगणगाव येथील सरपंच दुर्गाबक्षसिंग ठाकूर यांनी तक्रारीद्वारे म्हटले आहे
त्यातही विद्युत वितरण कंपनीने तक्रारी करिता दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक कोणीच उचलत नाही त्यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये सध्या विद्युत वितरण कंपनी बाबत भयंकर नाराजी निर्माण झालेले आहे
…………….
मला दोन दिवसाचा अवधी द्या…कनाठे
विजेच्या सतत पणे खंडित होण्याबाबत विद्युत वितरण कंपनीचे शहर अभियंता कनाठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात की, धामणगाव शहरात मागील दोन दिवसात तीन ठिकाणी आमचे मुख्य तारांवर वीज पडली त्यामुळे आम्हाला अत्यंत त्रासामधून हे सर्व करीत असताना अनेक डीपी मध्ये सुद्धा बिघाडाची दुरुस्ती करावी लागत आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात धामणगाव शहराचा विद्युत पुरवठा सुरळीत पणे होईल
…. ……………………..
अभियंता डेरे म्हणतात माणसं कमी काम जास्त…
जुना धामणगाव मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती असून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्यामुळे आणि पाऊस नसल्यामुळे चिंतेत आहे त्यातही अनेक ठिकाणची तार तुटून पडली असल्याने विहिरीतून पाणी देणे सुद्धा शक्य होत नसताना या भागातील अभियंता डेरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात की काम जास्त आहे आणि माणसं कमी आहे एक एक काम होईल यातही अभियंता डेरे भ्रमणध्वनी उचलत नसल्याचे सुद्धा अनुभव शेतकऱ्यांना आहे
……………………………
उपोषण करणार…ठाकूर
वादळ वारा किंवा पाऊसही नसतांना अनेकदा अचानक वीजपुरवठा खंडित होतो.संबंधित अभियंत्यांना कळवले तर ते लक्ष न देत नाहीत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण झालेली आहे.गावकऱ्यांना विद्युत खंडित झाल्याने रात्र जागे राहून काढवी लागते.पूर्वी वीज गेली तर झाडे कटिंगची कामे सुरू असल्याची कारणे असायची परंतु आत्ताही वारंवार बिघाड येत असूनही या विषयाचे गांभीर्य वितरण कंपनीला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असल्याने त्वरित लक्ष वेधून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा गावकरी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपविभागीय अभियंता कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंगणगाव चे सरपंच दुर्गाबक्षसिंग ठाकूर यांनी दिला आहे