तिवसा येथील जप्तीतील मुद्देमाल वैध

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 7 (जिमाका) :विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता दरम्यान 39 – तिवसा मतदार संघात निगराणी पथक तयार करण्यात आले आहे. ही पथके नियमित वाहनांची तपासणी करतात. तपासणी करताना त्यांना 5 नोव्हेंबर 2024 रोजी बोलेरो या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता यात मुद्देमाल आढळून आला. यात 229.614 किलोग्रॅम चांदी व 4.392 किलोग्रॅम सोने आढळून आले. यावेळी वाहनासह असलेले कर्मचारी याबाबत समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. हे वाहन सिक्वेल ग्लोबल प्रेशिअस लॉजिस्टिक्स या कंपनीचे असल्याचे कळले.

यानंतर या कंपनीला लेखी नोटीस व दूरध्वनीद्वारे आपली खरेदी पावती व आवश्यक सर्व दस्ताऐवजासह लेखी नोंद देण्याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर या कुरिअर कंपनीचे सेल्स मॅनेजर संतोष खुशालसिंग धोटियाल व जितेंद्र नरेश पवनीकर यांनी लेखी म्हणणे व आवश्यक वैध दस्तावेज पोलीस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी तसेच अन्य संबंधितांच्या सक्षम सादर केले. तसेच वाहनाचे वजनही इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर केले असता योग्य आढळून आले. याबाबतचा सर्व दस्तावेज व अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा तक्रार समितीचे अध्यक्ष संजिता मोहोपात्र यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती 39 -तिवसा विधानसभा मतदार संघातील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे .

veer nayak

Google Ad