चांदूर रेल्वे/आरोग्य सेवेवर लाखो रुपये खर्च केल्याचा प्रशासनाचा दावा सध्या स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पोकळ ठरत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, कारण गेल्या एका वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागा जवळ ऑपरेशन थिएटरमधील इलेक्ट्रिक फिटिंगसाठी निधी उपलब्ध नसल्या बाबत बोलले जात आहे.
स्थानिक ग्रामीण रुग्णालय निधीअभावी हात झटकत असल्याने येथील ऑपरेशन थिएटर गेल्या एक वर्षापासून बंद असून, तालुक्यातील व शहरातील रुग्णांना किरकोळ उपचारासाठी जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे.
स्थानिक ग्रामीण रूग्णालयात तालुक्याच्या व शहरातील रूग्णांसाठी छोट्या-मोठ्या ऑपरेशन्स केल्या जातात, तालुक्याची व शहराची वाढती लोकसंख्या पाहता ऑपरेशन थिएटर मोठे करणे व नूतनीकरण करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने स्थानिक बांधकाम विभागाला देण्यात आले, हे काम अंतिम टप्प्यात असून ही केवळ ऑपरेशन थिएटरमधील इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामासाठी निधी नसल्यामुळे मागील एका वर्षांपासून येथील ऑपरेशन थिएटर सुरू होऊ शकले नाही. हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक वेळा स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे आरोग्याशी संबंधित अशा महत्त्वाच्या सेवेसाठीही तालुक्यातील व शहरातील अनेक रुग्णांना जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत असून त्याचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे, आरोग्य सेवेची संबंधित असलेल्या अशा महत्त्वाच्या सेवेकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध होत नसल्याचे बाब संबंधित विभागाद्वारे केली जात आहे,