धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे येथे राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 15 जानेवारी 2025 गुरुवार रोजी करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून पर्यावरण प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रोशनजी ठवकर व श्री. सोळंके वनरक्षक सामाजिक परिक्षेत्र धामणगाव रेल्वे तसेच अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आ. सौ. देशपांडे व हरीतसेनेचे प्रमुख आ. श्री वडगिरे उपस्थित होते.

या प्रदर्शनीमध्ये प्रभात विभागातील विद्यार्थिनींनी विविध औषधी वनस्पतींची माहितीचे तक्ते, विविध पक्ष्यांची माहिती, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी भूस्खलन, आम्ल वर्षा, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा, वायु प्रदूषण, जलप्रदूषण, विविध ठिकाणच्या मृदा व मृदेचे प्रकार, रेन हार्वेस्टिंग, विविध पानांपासून विविध विविध पक्षांच्या प्रतिकृती, घरटी, शंखशिंपले, पर्यावरण पूरक पोस्टर यांचा समावेश होता.
या प्रदर्शनीला धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सन्मा.डॉ. श्री.असितजी पसारी यांनी भेट दिली व त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वडगीरे यांनी केले.















