मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रीया सुरू

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 09 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्य मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अमरावती येथे प्रवेश प्रक्रीया सन 2024-25 साठी सुरू करण्यात आलेली आहे. या वसतिगृहात अकरावी ते डिग्री डिप्लोमा, आयटीआय या अभ्याक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थींनी अर्ज करण्यास पात्र राहील.

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत निवास व भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता ड्रेसकोड भत्ता, सहल, प्रोजेक्ट अशा सोयीसुविधा मिळणार आहे. वसतीगृहात प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिकाची झेरॉक्स प्रत व जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वसतीगृहात प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्याक्रमासाठी युनिट क्र. 4 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नंदनवन कॉलनी कॅम्प, रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन 125 व्या जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहेत

veer nayak

Google Ad