धामणगाव रेल्वे तालुक्यातून बजरंग दल कार्यकर्त्यांची उपस्थिती
वृत्त:- विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण भारतभर 14 ऑगस्ट हा दिवस अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 14 ऑगस्ट पासून भारतभर पूर्ण सप्ताह या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येते. पूर्वी भारत हा अखंड भारत होता. मात्र नंतर या देशाचे अनेक विभाजनाच्या स्वरूपाने तुकडे झाले. अनेक देश भारतापासून वेगळे करण्यात आले. मात्र पुन्हा हे सर्व देश भारतात विलिन होऊन अखंड भारत निर्माण होण्याकरिता बजरंग दल आपला संकल्प दरवर्षी करत असतो. या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल धामणगाव प्रखंडातील तळेगाव दशासर बजरंग दल शाखेचे वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अखंड भारत मातेच्या फोटोचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे व प्रभू श्रीरामाच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री यवतमाळ मयूरजी पिसे हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अॅड विवेकजी सराप तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री पंडित शिवमजी मिश्रा, मा.श्री आनंदजी देशमुख, अविनाशजी बाबरे आदी मंचावर उपस्थित होते.
भारताला पुन्हा परम वैभव प्राप्त करून देण्याकरिता तथा भारत अखंड करण्याकरिता देशातील 140 कोटी भारतीयांनी आता समोर येण्याची गरज आहे असे आवाहन प्रमुख वक्ते मयूरजी पिसे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप महाआरतीने व जयघोषाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश निंबरते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता विशाल तिरमारे, विशू श्रीवास , हर्षल जोशी, श्रेयस सलोळकर , दर्शन सुने, विशाल बाबरे , शुभम वानखडे, दीपक काढापे, निखिल पुसतकर यांनी प्रयत्न केले.