मोर्शी येथे तालुकास्तरीय मेळावा संपन्न

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 अमरावती, दि. 21 इतर मागास बहुजन कल्याण विभागातील राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दि. 20 ते 29 ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी मोर्शी तालुक्यातील आर. आर. लाहोटी महाविद्यालय येथे तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी लाभार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

तालुकास्तरीय मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून आर. आर. लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एन. चौधरी, प्रमुख अतिथी विजाभज आश्रमशाळा, रिध्दपुरचे मुख्याध्यापक संजय कोहळे, इतर मागास बहुजन कल्याणचे निरिक्षक विशाल कोगदे, नविन जानोळे, गणेश नारनवरे, महाविलयाचे गिरीश उथखडे तसेच इतर मागासवर्गीय विकास महामंडळ व वसंतराव नाईक विकास महामंडळचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad