राजर्षी शाहू सायन्स कॉलेज येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे येथील राष्ट्रीय सेवा योजना व राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती तर्फे थोर पुरुषांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त हार अर्पण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग आर. वडनेरकर यांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. बी.एससी.भाग एक ची विद्यार्थिनी कु.अनुश्री गिरी हिने संचालनाद्वारे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारसरणीचे वाचन करून स्वामी विवेकानंद यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व ,जीवन चरित्राचे व त्याच्या आध्यात्मिक कार्याचे दर्शन घडविले तसेच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संकल्प करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी राजमाता यांनी हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्याकरिता शिवाजी राजांना कशा प्रकारे प्रेरित केले तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचार तरुणांना आत्मविश्वासात जगण्याची प्रेरणा देतात व राजमाता जिजाऊंचे संस्कार हे स्वराज्य व स्वराज्याचा पाया आहे विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचा व समाजसेवेचा संकल्प करावा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गजानन संतापे ,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.रोशनी भगत व सांस्कृतिक समितीचे समन्वयक प्रा. प्रवीण चव्हाण प्रा.पी.आर .देशमुख व प्रा. एस.एम. देशमुख यांनी केले.

veer nayak

Google Ad