हर हर महादेवा च्या नावाने दुमदुमली जटाधारी कावड यात्रा कौंडण्यपूर पासून दत्तापुर शिव मंदिर पर्यंत कावड यात्रेचे सफल आयोजन कौंडण्यपूर च्या पवित्र नदीच्या ५१ कलश जलाने झाले शिवचे अभिषेक

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:-दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जटाधारी कावड यात्रा समिती कडून भक्तिमय वातावरणात कावड यात्रा संपन्न झाली शेकडो युवकांनी कौंडण्यपूर या पवित्र नदी पात्रातून ५१ कलश जल आणून दत्तापुर येथील शिवमंदिर येथे शिवलिंगाचे ५१ कलश जलाने शिवचे अभिषेक करण्यात आले.कौंडण्यपूर ते दत्तापुर असा २४ किलोमीटर चा असा पायदळ प्रवास या कावड यात्रेत ५१ जल भरलेले कलश घेऊन पूर्ण करण्यात आला हे विशेष! जागोजागी फुलांच्या वर्षाव व फटाक्यांच्या आतिषबाजी ने या कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले.या कावड यात्रेसाठी मोठ्या संख्येने युवकांनी आपला सहभाग नोंदवला काल रात्रीच मोठया संख्येने युवक या कावड यात्रेसाठी कौंडण्यपूर ला रवाना झाले होते आज पहाटे ४ वाजता ही कावड यात्रा कौंडण्यपूर नदी पात्रातील ५१ कलश पवित्र जल धामणगाव दत्तापुर शिवमंदिर साठी निघाली असून दुपारी १ वाजता ही कावड यात्रा दत्तापुर शिवमंदिर येथे पोहचली ढोल,तासे व डीजेच्या तालात थिरकत शेकडो महिला व पुरुषांनी या भक्तिमय कावड यात्रेचे आनंद लुटले हर महादेव च्या घोषाने ही कावड यात्रा दुमदुमली होती दुपारी २ च्या सुमारास ५१ कलश पवित्र जलाने दत्तापुर येथील शिवमंदिर येथील शिवलिंग चे वैदिक मंत्राने जलाभिषेक करण्यात आले.

या जटाधारी कावड यात्रेत शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो महिला पुरुष,युवक,मोठया संख्येने उपस्थित होते या कावड यात्रेच्या सफल आयोजनासाठी सहकार्य करण्याऱ्या शिवभक्तांचे व उपस्थित सर्व नागरिकांचे आभार जटाधारी कावड यात्रा समिती द्वारे करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad