प्रवासी निवाऱ्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचे तहसीलदारांना निवेदन
अंजनसिंगी लोकमत न्यूज नेटवर्क येथील राज्य महामार्ग क्रमांक 300 यवतमाळ रिद्धपूर रोडवर 50 वर्षापूर्वी पासून असलेले प्रवासी निवारा रोडच्या रुंदीकरणामुळे व सिमेंट कारणामुळे फोडल्या गेले आणि त्याच ठिकाणी नव्याने प्रवासी निवारा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे यांना गावातील नागरिक आणि ग्रामपंचायतने अनेक वेळा निवेदने, आंदोलने केले परंतु प्रशासनाने आतापर्यंत प्रवासी निवारण नउभारल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांनी तहसीलदार धामणगाव रेल्वे यांना दिली आहे अंजनसिंगी हे गाव 8000 लोक वस्तीची असून परिसरातील बारा ते तेरा गावची प्रमुख बाजारपेठ आहे त्यामुळे शेकडो नागरिक दररोज शासकीय कामासाठी तसेच बाजारपेठेचा असल्यामुळे येथे ये जा करतात तसेच इथे बारावीपर्यंत शिक्षण सुविधा असल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी सुद्धा येथे येतात तसेच उच्च शिक्षणासाठी धामणगाव अमरावती येथे ये जा करतात परंतु या ठिकाणी प्रवासी निवारण असल्यामुळे विद्यार्थी नागरिक कधी ऑटोचा तर कधी हॉटेलचा सहारा घेतात त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका संभवू शकतो प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे अन्यथा निवडणूक बहिष्कार राहील असे आशयाचे निवेदन अशोक काळे यांनी दिलेली आहे त्यांना गावातील नागरिकांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे