आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : क्षेत्रभेट अंतर्गत शैक्षणिक सहलीचा आयोजन मा. मुख्याध्यापिका पदमा चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाला आकार देण्यासाठी शैक्षणिक सहल महत्त्वाची ठरते शैक्षणिक सहल मुलांना वेगळ्या वातावरणात एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी देते ते त्यांच्या अनुभवावर चर्चा करतात जे त्यांना अधिक जोडण्यास मदत करते .विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणात ठेवते जिथे ते नवीन लोकांशी भेटतात .शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांसाठी संवाद साधण्याचा अनुभव घेण्याचा आणि व्यवहारी दृष्ट्या सिद्धांत समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणूनच पी एमश्री शिवाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ताईचा मळा या निसर्गरम्य ठिकाणी नेण्यात आली तेथे विद्यार्थ्यांनी हिरव्यागार निसर्गाचा अनुभव घेतला निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा आस्वाद घेतला
तेथील झाडे प्राणी पक्षी याबद्दल माहिती जाणून घेतली साहसी उपक्रमात भाग घेतला. त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात बसून भोजनाचा आनंद घेतला
सहलीत एकूण 110 विद्यार्थी व चार शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र राज्य महा मार्ग परिवहनमहा मंडळाच्या दोन बसेस केल्या होत्या. जेवण नाश्ता खाऊची व्यवस्था केलेली होती विद्यार्थी खूप आनंदी व उत्साही होते एकंदरीत सहलीचा अनुभव खूप आनंददायी ठरला .
विद्यार्थ्यांमधील शिस्त ,आवड व उत्साह बघून तसेच विद्यार्थ्यांनी कुठेही कचरा न करता तो कचरापेटीतच टाकला त्यामुळे स्वच्छता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी रुजलेलं बघून तेथील अध्यक्षांनी शिक्षक व विद्यार्थी यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला
सहलीला शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री महेश मते सर,श्री विवेक कामाडी सर, सौ पूजा धर्म ठोक मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. हर्षाताई कानेटकर यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.