दाभाडा शाळेच्या विद्यार्थिनीचे जिल्हा स्तरावर उज्ज्वल यश

0
52
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दाभाडा प्रतिनिधी — जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, दाभाडा येथील वर्ग ६ वीची गुणवंत विद्यार्थिनी कु. नंदिनी सतीष भस्मे हिची जिल्हा स्तरावरील ‘नन्हे सितारे’ तसेच प्रश्नमंजुषा या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे शाळा, पालक व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल कु. नंदिनी हिच्यासह तिचे आई-वडील तसेच तिला योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. ब्राह्मण सर यांचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती जिल्हा परिषद, माननीय संगीता मोहपात्रा मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी माननीय संगीता मोहपात्रा मॅडम यांनी कु. नंदिनीचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा स्तरावर यश संपादन केल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कु. नंदिनीच्या या यशामुळे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, दाभाडा यांचा नावलौकिक वाढला असून तिच्या पुढील यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

veer nayak

Google Ad