आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे राज्यस्तरीय ‘फ्लेयर २०२६’ पीपीटी स्पर्धा उत्साहात संपन्न

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:

धामणगाव एज्युकेशन सोसायटी संचालित आदर्श विज्ञान, जे. बी. कला व बिरला वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘युवा शक्ती आणि AI-सज्ज उद्याचे विश्व’ या विषयावर आठवी राज्यस्तरीय ‘फ्लेयर २०२६’ पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण कौशल्य, तांत्रिक समज आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत राज्यातील १० महाविद्यालयांतील सुमारे १६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध उपविषयांवर विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, युवकांची भूमिका आणि भविष्यातील करिअर संधी यांची अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणी केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर बायस्कर अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. नितीन सिंघवी (सरदार पटेल महाविद्यालय, मोहदा) तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राधेशाम चौधरी (शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केळापूर) उपस्थित होते. वाणिज्य विभागप्रमुख व IQAC समन्वयक डॉ. आनंद नरांजे, स्पर्धा समन्वयक डॉ. नरेंद्र नागपुरे, आयोजन सचिव डॉ. रुपेश डाहाके व डॉ. जितेंद्र बारूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुधीर बायस्कर यांनी तरुण पिढीने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्योजकतेत आपले भविष्य घडवावे, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. नितीन सिंघवी यांनी सादरीकरण कौशल्य, नवोन्मेष आणि आत्मविश्वास या घटकांचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. राधेशाम चौधरी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आज प्रत्येक क्षेत्राची गरज बनली असून भविष्यात यशस्वी होण्यासाठी AI तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केले. पारितोषिक समारंभप्रसंगी विशेष अतिथी म्हणून युवा उद्योजक श्री. वैभव कुलकर्णी (धामणगाव रेल्वे) यांनी AI आधारित करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात विषयवार सादरीकरणातून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीतील सादरीकरणाच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
या वर्षीची स्मृतिचिन्हे व रोख पारितोषिके मातोश्री स्व. सुशीलादेवी प्यारेलालजी सिंघवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. अनुजा नितीन सिंघवी यांनी प्रायोजित केली. स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रावणी लोहारे (इंदिरा महाविद्यालय, कळंब), द्वितीय पारितोषिक नमन चांदवडकर व पार्थ गोधनकर (भारतीय महाविद्यालय, अमरावती) तर तृतीय पारितोषिक अमर महिसाने, विशाल इंगळे व वेदांत वाकडे (मेहरबानु महाविद्यालय, अकोला) यांनी पटकाविले. कु. गार्गी मांडळे व वेदांती झेले, सोनाली हटवार, गौरी पेटकर आणि प्रशंसा थूल यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. नरेंद्र नागपुरे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. पूजा सावंत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. भारती लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जितेंद्र बारूळकर, डॉ. रुपेश डाहाके, प्रा.सलोनी मासुरकर, प्रा.वैष्णवी भागवत तसेच वाणिज्य मंडळाचे सभासद आणि परीक्षण समितीतील तज्ज्ञ डॉ. सय्यद ओबेद कुरेशी, जितेंद्र सूर्यवंशी, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. किशोर बारापात्रे, डॉ. संदीप पेंदाम, डॉ. फुरकान पठाण, मोहसीन कुरेशी, दीपा बडनेरकर, प्रणाली वाकेकर, लेखा कोठारी, अमृता तिनखेडे व डॉ. राहुल ओझा (संचालक, प्रेरणा इन्स्टिट्यूट, अमरावती) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad