श्री रेणुका मातेच्या शोभायात्रेत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी घेतला दर्शनाचा लाभ
आर्वी ,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. २८/०२/२०२५ ला प्रशांत सव्वालाखे यांच्या निवासस्थान वरून श्री रेणुका देवी मूर्तीची पुजा अर्चना व आरती करून भजन मंडळांच्या टाळांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी प्रत्येकांनी आपल्या घरासमोरील रांगोळी काढून श्री रेणुका देवीच्या शोभा यात्रेचे मातेच्या भक्तांनी रेणुका देवीची पूजा अर्चना करून स्वागत केले. तसेच शोभायात्रेत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. पंकज भोयर व आमदार सुमित वानखडे, माजी आमदार दादारावजी केचे यांनी सुद्धा रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला संपूर्ण आर्वी शहरातील महिलांनी शोभायात्रेत भक्तीय वातावरणात गरबा खेळत आनंद लुटला तसेच संपूर्ण आर्वी शहरात श्री रेणुका देवीच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याने नवरात्रा सारखे वाटू लागले होते.
सकल मानव जातीच्या आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसोबतच भौतिक इच्छांची पूर्तता करून मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्याची अद्भूत क्षमता या श्री यंत्रामध्ये वसलेली आहे. या पवित्र श्री यंत्रच्या आकारातील ६१ फूट उंच असलेले भारतातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पूर्णत्वास आले आहे. या भव्य मंदिरात श्री रेणुका देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून, त्या निमित्ताने विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि संकीर्तनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या संकल्प
परीकल्पना व संयोजनात होणारा हा मंगलमय सोहळा आजपासून ते ७ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी ज्ञान पीठाधीश्वर श्रीमहंत श्री स्वामी सर्वेश्वरानंद सरस्वतीजी महाराज (श्रीकृष्ण आश्रम, बृजघाट गढ़मुक्तेश्वर) आणि साध्वी मृदुल दीदी (परमार्थ आश्रम, हरिद्वार) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर नवकुंडी महायज्ञ मुख्य पुरोहित
आचार्य महेशचंद्र व्यास तेलंगणा तसेच पुरोहित श्री कल्पेश दवे आर्वी तथा विद्वान ब्रम्हावृंदांच्या पौरोहित्यात व १७१ यजमानांच्या हस्ते संपन्न होणार आहे. २८ ते ६ मार्च नवकुंडी महायज्ञ, ६ मार्च श्री रेणुका देवी मूर्तीची श्रीयंत्र मंदिरात प्राणप्रतिष्ठा व ७ मार्चला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री यंत्र मंदिर श्री रेणुका देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा व नवकुंडी महायज्ञ सोहळा समितीच्या सदस्यांनी भाविकांना सहकुटुंब या पवित्र व मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.