चांदूर रेल्वे :- तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा – रामनवमी यात्रा महोत्सव सुरु असताना संस्थानने दैनंदिन कार्यक्रम सुरु असताना संस्थान सामाजिक उपक्रम देखील राबवत आहे. अशातच
दिनांक 05/04/2025 शनिवारला सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सांस्कृतिक भवन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगा विठोबा आणि परतवाडा येथील डॉ. सदानंदजी बर्मा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर आयोजित केले असून संस्थानचे अध्यक्ष श्री पुंजाराम वै.नेमाडे (गुरुजी) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपाध्यक्ष श्री कृपासागर रा.राऊत, सचिव श्री अशोक ह.सोनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
सदर शिबीराचे रक्त संकलन सदर ब्लड बँकची तज्ञ चमु करणार असून रक्तदानास इच्छुकांनी मो. क्र 9970501898, 9403621600 वर संपर्क करून नाव नोंद करावे तसेच संस्थानच्या देणगी कक्षावर सुद्धा नाव नोंदणी सुरु असल्याचे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.