चांदुर रेल्वे :-
तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे येत्या दि. ८ सप्टेंबर २०२५, सोमवारला चंद्रग्रहण निमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार दुपारी १२.०० वाजता चंदनउटी उत्सव संपन्न होणार आहे.
संस्थानच्या वतीने बाहेरगावावरून आलेल्या भाविकांसाठी अन्नदान समितीच्या नियंत्रणाखाली दुपारी २.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दैनंदिन प्रसाद वितरणाची सोय करण्यात आली असून बाहेर गावातील भाविकांना दुपारी १२.०० ते १.३० व रात्री ८.०० ते ९.३० या वेळेत प्रसादालयात भोजन मिळणार आहे. प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी प्रसादालयात देणगी पावती घेणे आवश्यक आहे.
संस्थानच्या वतीने अन्नदान इच्छुक दात्यांनी देखील अन्नदान देणगी देवून या पुण्यकार्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे संस्थानचे वतीने दि.२१ सप्टेंबर २०२५ रविवार ते दि.६ नोव्हेंबर २०२५ गुरुवार या कालावधीत कार्तिक मास निमित्त अखंड भजन मांडीचे आयोजन दिवस आणि रात्री पाळीत करण्यात येत आहे,ज्या इच्छूक अवधूत मंडळांना या मांडीत दिवस आणि रात्री पाळीत सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी संस्थानचे सचिव अशोक हरिदासजी सोनवाल यांचा मो.क्र.९९२३७०२१०३ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
या धार्मिक उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त मंडळातील विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी व समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.