श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप. सुसंस्कार शिबिरे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ग्रामगीताचार्य श्री हनुमंत ठाकरे धामणगाव रेल्वे… श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर जुना धामणगाव येथे समारोपीय कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून क्रीडा विभागाचे प्रमुख श्री महेश धांदे वस्तीगृहाचे प्रमुख अंकुश डुकरे ,काजल आरोग्य ,सेविका संघर्षा पाटील ,पद्माताई पटोरकर, हर्षाली कुईटे माधुरी व शिबिर प्रमुख प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले . गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का विजयारा या संकल्पगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

हिमांशू घाडगे या विद्यार्थ्यांनी दीपा सणाद्वारे सर्व पाहुण्यांचे प्रात्यक्षिक आणि स्वागत केले. बौद्धिक तासाकी अंतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती ,राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता ,नव समाज, संत महापुरुष यांच्या विषयी माहिती दिल्या गेली होती त्यावर विद्यार्थ्यांनी वकृत्व कला सादर केली त्यामध्ये मेहुल शेंडे ,नक्षमेंढे, अंश माणूसमारे, प्रणय उल्ले या विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केले. पाठांतरामध्ये मराठी श्लोक हिंदी श्लोक, ग्रामगीतेच्या निवडक ओव्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सोबतच प्यारा हिंदुस्तान है गोपालो की शान है ,भारतात बंधुभाव नित्य वसु दे दे वरची असा दे ही भजने सादर केली .विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संरक्षणाच्या धडे म्हणून कराटे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केले. प्रमुख मार्गदर्शक प्रमुख ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले आजचे मोबाईलची युग असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे.

जे पाहू नये ते पाहायले जात आहे जे खाऊ नये ते खाल्ले जात आहे त् जे पिऊ नये ते पिल्या जात आहे. यांने आज प्रत्येक आई-वडील त्रस्त झालेले आहे यावर एकच उपाय संजीवनी म्हणजे बालवयात सर्वांगीण सुसंस्कार शिबिर हे आपल्या मुलांमध्ये परिवर्तन करू शकते म्हणून श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर काळाची गरज आहे ,असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले. विद्यार्थ्यांना चांगल्या कार्यासाठी बक्षीस वितरण करण्यात आले .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संत साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले .शेवटी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असे वाटप करून राष्ट्र वंदना करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे आभार प्रदर्शन पार्थ वासेकर यांनी केले कार्यक्रमाला संपूर्ण शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad