अमरावती, दि. 23 : सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे गुरूवार, दि. 24 जुलैपासून तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दारापूर, दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला न्या. गवई उपस्थित राहतील.
उद्या गुरुवार, दि. 24 जुलै दुपारी 3. 45 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल.
शुक्रवार, दि. 25 जुलै रोजी सकाळी 10.45 वाजता दारापूर येथील विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून दर्यापूर येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.
शनिवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.35 वाजता सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई -लायब्ररीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून सोयीनुसार बेलोरा विमानतळावरून श्रीनगरकडे प्रयाण करतील.