एस ओ एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे श्लोका स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचे आयोजन…

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे श्लोका स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धर्मामध्ये श्लोकाला एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. ज्यामध्ये देवी देवतांची पूजा व स्तुती केली जाते. या स्पर्धेमध्ये नर्सरी ते के.जी.२ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या स्पर्धेकरिता परीक्षिका म्हणून आदर्श महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर पूनम उमप मॅडम यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांनी परीक्षिका डॉक्टर पूनम मॅडम यांचे वेलकम कार्ड व सॅपलिंग देऊन स्वागत केले. चिमुकल्यांनी आपल्या आईसोबत मराठी ,हिंदी आणि संस्कृत भाषा मध्ये श्लोक सादर केले. या स्पर्धेमध्ये के.जी.१ ची विद्यार्थिनी कुमारी वैदही शर्मा हिने प्रथम क्रमांक तर कुमारी आभा बारूलकर आणि कुमारी ओजस्वी इंगोले यांनी दुसरा क्रमांक पटकाविला तर कुमारी कनिष्का इंगळे ,कुमारी आरल ठाकरे आणि कुमारी सानवी बुधलानी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यात आला .शांततेची संस्कृती जोपासणे हा या दिवसाचा उद्दिष्ट आहे .संवाद, सहानुभूती आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी नर्सरी ते के.जी. २ च्या पालकांनी पोस्टर बनविण्याच्या उपक्रमा मध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने ,वर्षा देशमुख, राणी रावेकर, आकांक्षा महल्ले ,प्राजक्ता दारुंडे ,श्रद्धा रॉय आणि अश्विनी नंदाने मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad