श्री विठोबा संस्थान, श्री क्षेत्र सावंगा विठोबा चे कर्तव्यदक्ष अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड

0
180
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे :- महाराष्ट्र नगर परिषद/महानगर पालिका सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या आज नागपूर येथील शिक्षक भवनात पार पडलेल्या सभेत पुंजाराम नेमाडे (गुरुजी) यांची राज्य उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन देत सभागृहात आनंदोत्सव साजरा केला.

सेवानिवृत्त शिक्षक म्हणून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून उल्लेखनीय योगदान दिलेल्या पुंजाराम नेमाडे गुरुजींच्या निवडीमुळे संघटनेला बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

veer nayak

Google Ad