धामणगाव रेल्वे,
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र च्या वतीने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह २०२४ निमित्त ६ मे पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आयोजित करण्यात आलेला असून ३० एप्रिल पासून विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ३० एप्रिल ला नित्य स्वाहाकार,मंडल स्थापना अग्नि स्थापना तसेच गुरुचरित्राचे वाचन करण्यात आले.
१ मे ला नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोध याग २ मेला नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग ३ मे २०२४ ला नित्य स्वाहाकार तसेच चंडीयाग ४ मे ला नित्य स्वाहाकार श्री गीताई यागचे आयोजन करण्यात आले असून ५ मे ला नित्य स्वाहाकार सोबतच श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग चे आयोजन आणि सोमवार ६ मे ला नित्य स्वाहाकार सोबतच बली पूर्णाहुती व सत्यदत्त वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे याच दिवशी श्री स्वामी समर्थ केंद्र तर्फे महाप्रसादाचे भव्य आयोजन सुद्धा करण्यात आले असून महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र तर्फे करण्यात आले आहे