(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचलित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा तालुका धामणगाव रेल्वे यांच्याद्वारे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दत्त ग्राम शिदोडी येथे दिनांक ७/१/२०२५ ते १३/१/२०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना व युवकांमध्ये देश सेवा व समाजसेवेची आवड निर्माण व्हावी या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचेकडून प्राप्त निर्देशानुसार शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे अंतर्गत करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शिदो डी ग्रामपंचायत येथील सरपंच सौ करिष्मा ताई शिवरकर, उद्घाटक देवेंद्रजी वाल्हेकर श्री सुधाकरराव बांते , श्री सुदामराव नागपुरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच शिदोडी रितेश जी निस्ताने प्राचार्य वृषाली देशमुख, पोलीस पाटील सौ संजीवनी निस्ताने, मनोहरराव निस्ताने, गजानन निस्ताने, डॉ मेघा सावरकर, प्रमोद नागपुरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिपक बोंद्रे उपस्थित होते. सदर कार्यक्रम डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला येथील विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना डॉ संदीप हाडोळे व महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, पुणे यांचे उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व परमहंस सद्गुरू श्री संत शंकर महाराज व पंजाबराव देशमुख यांचे फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा दीपक बोंद्रे यांनी उपस्थित यांना राष्ट्रीय सेवा योजना बद्दल विशेष माहिती प्रदान केली. व गावकऱ्यांसाठी सात दिवस आयोजित विविध कार्यक्रमांमधील ग्राम स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी शिबिर, रक्तशय व सिकलसेल तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, विविध पथनाट्य, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, जलसंवर्धन कार्य, वृक्ष लागवड, श्रमदान अंतर्गत शेतकऱ्यांना निंबोळी अर्कतयार करण्याची पद्धत समजावून देणे,खत कुजविण्याची प्रक्रिया ,जीवामृत निर्मिती, दशपर्णी अर्क निर्मिती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन संध्या, प्राणायाम, योगासन, इत्यादी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक देवेंद्रजी वाल्हेकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. प्राचार्य सौ. वृशाली देशमुख यांनी सर्व शिबिरार्थींना गावांमध्ये सर्व उपक्रम राबविताना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले. यानंतर गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री मनोहरराव निस्ताने यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा पवन शिवणकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुमारी नितनवरे यांनी केले .
या उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख तसेच सर्व पदाधिकारी महाविद्यालयाच्या प्राचार्य, सौ.वृषालीदेशमुख, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,विशेष शिबिरातील सर्व स्वयंसेवक, तसेच शिदोडी गावचे पदाधिकारी तथा ग्रामस्थ त्यांचे सहकार्य लाभत आहे.