श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “कृषी उमंग” विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरे.

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे वार्ताहर ) डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कृषी उमंग दिनांक 7/3/2026 ते 8/3/2026 दरम्यान विविध उपक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सन्माननीय शिक्षक आमदार तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कार्यकारणी सदस्य श्री किरण राव सरनाईक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री संत शंकर महाराज आश्रम चे विश्वस्त श्री. संजू भाऊ देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री सुधाकरराव बांते , सुदामराव नागपुरे, भास्करराव मोहोड, कृषी महाविद्यालयात व्यवस्थापन समिती सदस्य महादेवराव शिवनकर ,पोलीस पाटील पिंपळखुटा सौ. शारदाताई गायके, प्राचार्य डॉ. शरद नायक, स्नेहसंमेलन प्रभारी प्रा दीपक बोंद्रे, प्रा. वृषाली देशमुख ,सत्कारमूर्ती प्रतिथ यश बागायतदार शेतकरी नामदेवराव वैद्य निंभोरा बोडखा, निखिल तेटू,रमेश साखरकर भिल्ली, किरण इंगळे मंगरूळ दस्तगीर, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्घाटक सन्माननीय किरण सरनाईक यांचे हस्ते परिसरातील प्रगतिशील व विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी नामदेवराव वैद्य, निखिल तेटू, रमेशराव साखरकर, किरण इंगळे, यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. किरण राव सरनाईक व निखिल तेटू यांनी उपस्थित त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. व शैक्षणिक प्रगती सोबत विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक व इतर आवश्यक बाबी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा दीपक बोंद्रे यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, फॅशन शो, नृत्य स्पर्धा, फिश पॉड व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी महिला दिन, समारोपय कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. संत शंकर महाराज आश्रम चे विश्वस्त श्री सुधाकरराव बांते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त भास्करराव मोहोड, पिंपळखुटा येथील प्रथम नागरिक दिलीपराव राऊत, विमलाताई देशमुख महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य डॉ. स्मिताताई देशमुख महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका सौ शिप्राताई मानकर, संचालक मध्यवर्ती संशोधन केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला डॉ. वर्षाताई टापरे, प्राचार्य डॉ. शरद नायक,डॉ. नरेश इंगळे, रवींद्र उगले, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी अनुश्री पूलकंठवार, जतिन आंबीलडूखे उपस्थित होते .

दीप प्रज्वलन, फोटो पूजन व हार अर्पण कार्यक्रमानंतर पाहुण्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. स्मिताताई देशमुख, डॉ. वर्षाताई टापरे व सौ क्षिप्राताई मानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व महिला दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. त्यानंतर स्नेहसंमेलनातील विविध विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे प्राध्यापक प्रा. निलेश शेळके यांचा नेट परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबद्दल तथा प्राचार्य डॉ शरद नायक यांनी कृषी विद्या विभागात पुस्तक प्रकाशन बाबत तसेच प्रा.ऋषली देशमुख यांनी अर्थशास्त्र विभागातील पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशन केल्याबाबत यावेळी मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. स्नेहसंमेलनाचे यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, महाविद्यालयातील स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी महादेवराव शिवनकर एडवोकेट प्रकाशराव देशमुख सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी, प्राचार्य डॉ. शरद नायक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad