आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : श्री. संत गजानन महाराज मंदिर,गजानन नगर आर्वी येथे प्रकटदिन महोत्सव रोज रविवार दि.08.02.2026 होणार आहे
शनिवार दि. 07.02.2026 सायंकाळी 4.00 वा : श्रींची पालखी परिक्रमा रात्री 9.00 वा : खंजरी भजन श्री लहानूजी कला संच (श्री उमेश चोरे व संच)
रविवार दि 08.02.2026,सकाळी 7.00 वा : श्रींचा अभिषेक व तिर्थ स्थापना सकाळी 10.00 वा : काल्याचे कीर्तन ह. भ. प. संदीप महाराज तायवाडे अमदोरी ता. चांदुर (रेल्वे) जि. अमरावती, दुपारी 1.00 ते रात्री 9.00 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
तरी भक्तांनी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन
गजानन नगरवासी व समस्त भक्तगन, आर्वी यांनी केले










