श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकाचे 7 जानेवारी 2025 ला तात्याजी महाराज मंदिर येथे होणार दर्शन

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या सेवाभावी धार्मिक सस्थेव्दारे, श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या धर्म जागरण परंपरेचे कार्य अखंडपणे सुरू आहे. या कार्याचा एक भाग म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः वापरलेल्या व सद्यस्थितीत सज्जनगड स्थीत स्थापीत असलेल्या श्री चरण पादुका महा सत्संगासाठी श्री राम मंदीर, रामनगर, नागपूर येथे दर्शनार्थ अल्प दिवसासाठी उपलब्ध आहेत.

समर्थ भक्त श्री योगेशबुवा रामदासी कार्यवाह श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली नागपूर येथील महासत्संग श्री चरण पादुकांच्या सहवासात सुरू आहे.

श्री संत तात्याजी महाराज भक्ती परंपरेतील संत व समर्थ भक्त ब्रम्हचारी महंत श्री मधुबाबा माटे महाराज यांचे 11 वे पुण्यतिथीचे औचीत्य साधुन, परंपरेतील भक्तांना व आर्विकर मावीक भक्तांना या श्रींच्या पादुकांचे दर्शन घेता यावे यासाठी आमची विनंती विषेष बाब म्हणून मान्य करण्यात आली.

तेव्हा श्री समर्थ सेवा मंडळाचे साधक समर्थ भक्त सदर पादुका घेऊन नागपूर वरून आर्विला येतील व निश्चित वेळेनुसार परत जातील.

 

श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुका, श्री संत तात्याजी गहाराज देवस्थान, महादेव वार्ड, आर्वी येथे मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी फक्त दुपारी 12.00 ते 2.00 या वेळेत पुजा व दर्शनासाठी उपलब्ध राहतील.

याच दिवशी खालील प्रमाणे सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत

ब्रम्हचारी महंत श्री मधुबाबा माटे महाराज यांचे समाधीस सहस्त्रधारा रूद्राभिषेक राहणार आहे व दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत नामसंकिर्तन व श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरण पादुका पुजा, दर्शन, आरती व प्रसादाचा लाभ घेता येणार आहे तरी सर्व श्रीच्या भक्तांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरणपादुकाचे दर्शन संत साहित्य विचारवंत हभप प्रा. डॉ. श्री नारायण निकम यांनी तात्याजी महाराज मंदिर महादेव वार्ड येथे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण भक्त व आर्वीकर नागरिकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा असे विनंती करून सांगितले.

veer nayak

Google Ad