श्री रामदेवजी महाराजांच्या संगीतमय अमृत कथा महोत्सव

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

राजस्थान रुणीचाचे बाबा रामदेवजी श्रीद्वारकाधीश अवतार आहेत रामदेव बाबांची पूजा किंवा रामदेव बाबांना मारणारे कोणत्या एका जाती धर्माचे नसून द्वारकाधीश आणि भगवान कृष्ण यांच्या अवतार असलेले बाबा रामदेवजी यांना संपूर्ण जगात पुजल्या जात असे उद्बोधन आपल्या कथेच्या माध्यमातून जगप्रसिद्ध कथा वाचक कलकत्ता येथील संत जयप्रकाश महाराज यांनी धामणगाव येथे व्यक्त केले ते श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती यांच्या वतीने येथे आयोजित द्वारकाधीश अवतारी भगवान श्री रामदेवजी महाराजांच्या संगीतमय अमृत कथा महोत्सव प्रसंगी बाबांचे विविध परचे प्रस्तुत करताना उद्बोधन करतांना ते म्हणाले की, कृष्ण अवतार बाबा रामदेव बाबांचे दर्शन घ्यायचे असेल तर आपला अधिकाधिक वेळ गौरक्षण मध्ये व्यतित करा कारण देव सुद्धा गोमातेची सेवा करतात पहाटे सूर्य उदय च्या पूर्वी झोपेतून उठून प्रत्येकाने सूर्यदर्शन केले तर सूर्य किरणाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ची कीर्ती उजळेल ज्या घरात सत्संग कीर्तन भजन होतो त्या कुटुंबात सदैव, सुख, शांती आणि समृद्धी असते ही काळया दगडावरची पांढरी रेष

  श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हम अपनी रिसॉर्ट येथे श्री रामदेव बाबा यांच्या जीवनावरील अमृत कथा महोत्सवा मध्ये धामणगाव वासियांचा प्रचंड उत्साह ओसंडून आला कथेमध्ये होम हवन पूजेचे दायित्व शरद महाराज पांडे,पंडित नितिन गाड़े

पंडित श्याम मिश्रा महाराज यांनी सांभाळले रामदेव बाबांच्या या कथेमध्ये संपूर्ण विदर्भातून शेकडो भक्त उपस्थित होत आहेत

कथा वाचन कोलकाता येथील संत जयप्रकाशजी महाराज यांच्या वाणीतून होत आहे. दररोज दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असलेले अमृत कथेमध्ये विविध झाक्या प्रस्तुत करण्यात आल्या.कथेत रामदेव बाबांच्या भूमिकेत भरत पालीवाल, भैरव राक्षस भरत शर्मा, गुरु बालीनाथ ऋषि भूमिका रोहित शर्मा यांनी निभावली

veer nayak

Google Ad