मंगरूळ दत्त:
स्थानिक धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगरूळ दत्त या गावात श्रीराम मंदीर जन्मोत्सव समिती अंतर्गत, सुप्रसिद्ध प्रवचनकार व्याख्याता डॉ. छाया विजयराव नाईक, नागपूर यांचे *मर्यादा पुुरूषोत्तम* *राम या विषयावर* त्यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन होणार आहे. दिनांक 30 मार्च 2025 ते दिनांक 06 एप्रिल 2025 दरम्यान हे प्रवचन आयोजित केले असून रोज सायंकाळी 7.वाजता श्रीराम मंदिर वार्ड न.4 मंगरूळ दत्त येथे संपन्न होणार असून या प्रवचनाकरिता मंगरूळ दत्त गावातील सर्व भाविक भक्तांनी नागरिकांनी महिलांनी उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदीर जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.