श्रीराम जन्मोत्सव समिती द्वारा बुधवारी शहरात भव्य दिव्य  शोभायात्रेचे आयोजन आणि  ‘जय श्री राम’ च्या गगन भेदी जयघोषानांनी शहर दुमदुमले.

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दरवर्षी शहरात श्रीराम जन्मोत्सव समिती च्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. शोभायात्रेत  ग्रामीण भागातून व शहरातून प्रचंड भाविकभक्तांची  गर्दी होते. बुधवारला  श्रीरामनवमी जन्मोत्सव शहरातील विविध मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे शोभायात्रेला स्थानिक जुना दत्तापूर येथील सुरुवात झाली. याप्रसंगी शोभायात्रेत असलेल्या श्रीराम मूर्तीचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य चंद्रशेखर राठी  आमदार प्रताप अडसड,प्रशांत बदनोरे ,प्रमोद (मुन्ना) मुंदडा, शोभायात्रा समिती चे अध्यक्ष विनोद जयस्वाल, उपाध्यक्ष बंटी ठाकूर,योगेश मारवे,भैय्या पांडे सह इतर मान्यवर व आयोजन समितीच्या प्रमुखांनी केले.

ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या  भव्यदिव्य शोभायात्रेमध्ये डीजेच्या तालावर भाविकांनी ताल धरला होता. दरम्यान ‘जय जय राम,जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमले होते.बेंजोबँड,भजनी मंडळे, अश्व रथावर स्वार भगवान श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमानाच्या सजीव देखावा,भारत माता,गौ रक्षा राष्ट्र रक्षा,गाय बचेगी,देश बचेगा त्याचप्रमाणे शरयू नदीच्या पात्राला पार करणारा केवट देखावा ,श्रीराम द्वारा जलाभिषेक व श्री राम देखाव्याचे भाविकांनी दर्शन घेतले.३ भजनी मंडळ ,उजैन च्या महाकाल पथकाने गर्दीचे लक्ष वेधले श्रीराम हनुमंताच्या वानर सेनेचे वेशभूषेतील सजीव देखाव्यात उपस्थित लहान बालके यावेळी श्रीराम जयघोषात सामील झाली होती या शोभायात्रेत भगवान श्रीरामाची व हनुमानाची सुंदर आणि देखणी भव्य मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचे स्थान ठरली.दरम्यान शोभायात्रेतील  श्रीराम मूर्ती चे जागोजागी पुष्प वर्षाव करून पूजन  करण्यात आले.

सदर शोभायात्रा जुना दत्तापूर येथून निघून कॉटन मार्केट,चौक अमर शहीद भगतसिंग चौक,रेल्वे गेट,गांधी चौक व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून सिनेमा चौक ते टिळक चौक,छत्रपती शिवाजी चौक येथे महाआरती करून शोभयात्रेचे समारोप करण्यात आला. शोभायात्रे दरम्यान प्रत्येक ठिकाणी  शोभयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले तर अनेकांनी अल्पोपहार,जलपाणाची व्यवस्था करून भाविकांच्या गर्दीला प्रसाद वितरण केले. शोभायात्रेला यशस्वी  करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad