अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दि.२/९/२०२४ रोजी श्री हनुमान मंदिराजवळ बैल पोळा भरविण्यात आला.या पोळ्यात ३८ बैल जोड्यांचा सहभाग होता.या पोळ्यांचा मान नाना मारोतराव कुकडकर (पाटील) यांच्या घरुन निघालेल्या गुढीने आणि घाट वितरण तसेच धूप दाखवून यांचे शुभ हस्ते बैल जोड्यांचा सन्मान करण्यात आला.यावर्षी प्रथम-गजानन भुताडे,द्वितीय-परशराम होले, तृतीय-गणेश खंगार यांना सरपंच बंडूभाऊ भोजने,ग्रा.पं.सदस्या इंदू नांदुरकर, श्री विठोबा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांचे शुभ हस्ते सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.तसेच श्रीकृष्ण मंगळे,प्रविण कुकडकर,मनोज गोरडे,अवी मेश्राम,प्रेमदास रामटेके यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला पं.स.सदस्य अमोल होले,उपसरपंच काशिनाथ मेश्राम,ग्रा.पं.सदस्य संजय मेंढे,से.स.सो.अध्यक्ष विशाल होले,तं.मु.अध्यक्ष सुभाष कडू,पोलीस पाटील हिरासिंग राठोड,प्रतिष्ठित नागरीक रमेश मंगळे,दिगांबर राठोड, सुभाष कुकडकर,परवेश भंसाली तसेच बहुसंख्येने ग्रामवाशी यांची उपस्थिती होती.
Home आपला विदर्भ अमरावती श्री क्षेत्र सावंगा विठोबा नगरीत बैल-पोळा निमित्त सत्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा