आचार्य वेरूळकर गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये संस्कार शिबिराच्या माध्यमातून हजारो तरुणांना संस्काराचे धडे देऊन महान कार्य केले. म्हणून त्याचा जन्म दिन संस्कार दिन म्हणून साजरा करतात संस्कार महर्षी यांना कोटी आयुष्य लाभण्यासाठी प्रबोधन वारी विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमामध्ये आज समाजाला आवश्यकता आहे .या कोवळ्या कळ्या माजी लपले l ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगटतील शेकडो महापुरुष ll. ग्रामगीता ll अध्याय 19 वा जीवन शिक्षण आज समाजामध्ये सुसंस्काराची अत्यंत आवश्यकता आहे. हे आपल्याला माहीतच आहे. कारण या कलियुगामध्ये आज आपण पाहतो आहे वाढते व्यसनाधीनता ,भांडणे, तंटे ,चोरी आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणे, सर्रास कचरा रस्त्यावर टाकणे ,खून,संत महापुरुषांच्या विचार आज घराघरातून समाप्त होत आहे. घराघरात कलह वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम आजच्या विद्यार्थी जीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहे .जर त्यांना वेळी सावध केले नाही. त्यांच्यावर योग्य संस्कार केले नाही .तर हा समाज संस्कारहीन होईल म्हणून याच उद्देशाने संस्कार दिनाच्या औचित्य साधून

आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी भिख राज गोयन कन्या शाळा नगरपरिषद धामणगाव रेल्वे येथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कल्पनाताई कनोजकर प्रमुख अतिथी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे ,श्री ओंकारजी उंदरे ,मुख्याध्यापिका उंदरे मॅडम उपस्थित होते. ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सुसंस्कार हे घरापासून असावे गुरुजींना पासून असावे जर ते नसेल तर कुटुंब खराब होईल समाज खराब होईल व देश खराब होईल म्हणून आज सुसंस्कार अत्यंत आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले साने गुरुजी महात्मा फुले, बाबा आमटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज ,संत तुकाराम महाराज ,संत ज्ञानेश्वर महाराज ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या बालपणीच्या गोष्टी व विविध दृष्टांत देऊन विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे देण्यात आले .यावेळी समाजामध्ये सध्या अराजकता माजलेली आहे त्याला आळा घालण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर विशेष प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतिवीर भगतसिंग, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आज अत्यंत आवश्यकता आहे असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या प्रबोधनातून केले .प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रामगीता, भगवद्गीता रामायण ,महाभारत ,यांसारखी पवित्र जर ग्रंथ असेल व त्याची आपण वाचन जर केले तर घरामध्ये आनंद निर्माण होऊन संस्काराची रुजवणूक होईल असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले .यावेळी उपस्थित असणारे पालक व विद्यार्थ्यांना विविध संत ,महात्मे ,सामाजिक थोर विचार ,यांच्यावर प्रश्न मंजुषा घेण्यात आली त्या मध्ये ज्यांनी उत्तरे दिली त्यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंद होता या कार्यक्रमाला सीमाताई श्रीनिवास, प्रांजली तिरमारे ,निशा शेंडे ,यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या शेवटी गेले सांगून गाडगेबाबा या गीत गाऊन राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थिनी सर्व कर्मचारी उपस्थित होते.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.















