बाभूळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर शिवारातील शेतकऱ्याच्या उभ्या पिकाला आग लावल्याची घटना दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता च्या सुमारास घडली मागणी येथील शेतकरी राहुल मोहतुरे यांच्या शेतात शेतालगत असलेल्या विजय शामराव साळवे यांचे लागूनच शेत असून यांच्या शेताची देखरेख करण्याकरिता शंकर शेंडे वय 50 वर्ष रा. कृष्णापुर हा दिवाणजी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असून याने फिर्यादीचा भाऊ राहुल मेकर याला फोनवरून माहिती देत सांगितले की तुमच्या शेतात अचानक आग लागली आहे यामध्ये स्प्रिंकलर व पाईप जळाले आहे अशी माहिती त्यांनी दिली मात्र त्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय व्यक्त केला.याप्रकरणी अलका हरीश डेहनकर यांनी बाबुळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञानाचा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्का हरिष डेहणकर यांची कृष्णापूर शेत शिवारातील शेती साहित्य नुकसान झाले आहे.फिर्यादी व इतर 5 नावाने कष्णापूर शिवारात सामाईक शेती असून तिचा शे सर्वे क्र. 10/02 प्रमाणे 1.96 हेक्टर शेतजमीन आहे यावर्षी रब्बी हंगामात शेतामध्ये अंदाजे 1 एकर गव्हाचे पिक लावले त्या पिकाला पाणी देण्या करीता 30 पाईप व 8 स्पीकलर असे शेतात होते. शेतालाच लागून विजय शामराव साळवे यांचे शेत असून धुऱ्याला धुरा लागून असून त्यांचा व माझ्या शेताचा सामाईक धुरा आहे. त्याचे शेताची देखरेखी करीता शंकर येडे वय अं. 50 वर्ष रा. कष्णापूर हा दिवानजी आहे. दिनांक 10/04/2025 रोजी सकाळी 10:18 वाजता फिर्यादीचा भाऊ राहुल मेहकरे यांनी फोनकरून सांगीतले की,आपल्या सामाईक शेतात अचानक आग लागली त्यामध्ये स्पीन्क्लर व पाईप जळाले शेताची जावून पाहणी केली असता विजय शामराव साळवे यांचे धुऱ्या कडून आमच्या धुरा पेटलेला दिसला त्या धुऱ्याला लागून 30 पाईप पैकी 15 पाईप व 8 पैकी 6 स्पीन्क्लर असे जळालेले होते ते शंकर येडे वय अं. 50 वर्ष रा.कृष्णापूर यांने शेतमालकाच्या सांगण्यावरून हेतू पुरस्कार धुरा पेटवला असून एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान केले असे असे फिर्यादीचे आरोप असून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.