राजर्षी शाहू सायन्स कॉलेज येथे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी “फ्रीलान्सिंग करिअर संधी” या विषयावर मार्गदर्शनपर सत्र

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र राज्य उच्चं व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वागीण विकासाकरिता सुरु असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत राजर्षी शाहू सायन्स कॉलेज,चांदूर रेल्वे येथे दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता पदवीधर विद्यार्थ्यांसाठी “फ्रीलान्सिंग करिअर संधी ” या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले. आजच्या AI युगात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पर्यायी करिअर संधींचे महत्त्व लक्षात घेऊन हे सत्र विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे आयोजन आणि मार्गदर्शन प्रा.ममता पळसपगार (करिअर कट्टा समन्वयक) यांनी केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात फ्रीलान्सिंगची मूलभूत संकल्पना, त्यातील विविध क्षेत्रे जसे की कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, डेटा एंट्री इत्यादींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच Fiverr, Upwork, Freelancer यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी कसे काम मिळवू शकतात याचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंगसाठी आवश्यक असणारी कौशल्ये, वेळेचे नियोजन, क्लायंटशी संवाद साधण्याची पद्धत, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करणे आणि कामातील सातत्य राखण्याचे महत्त्व यावरही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “Learn, Earn and Grow” या संकल्पनेचा अवलंब करून शिक्षणाबरोबरच आर्थिक स्वावलंबन साधण्याच्या दिशेने कशी वाटचाल करता येते यावर विशेष भर दिला. या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले यामध्ये फ्रीलान्सिंगमध्ये येणाऱ्या अडचणी, सुरुवात कशी करावी, तसेच विश्वासार्हता कशी निर्माण करावी. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या करिअर संधींबद्दल जागरूकता निर्माण झाली.

अशा प्रकारचे उपक्रम आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर यांचे नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. सोबतच IQAC समन्वयक प्रा. एस. ए. वाणी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा सहकार्य लाभले आणि महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे मार्गदर्शन सत्र पूर्णत्वास गेले.

veer nayak

Google Ad