ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे. जीवनामध्ये प्रत्येकाने म्हातारपणी आई वडिलांची सेवा करावी कारण हे कार्य महान तीर्थ आहे.जे जगामध्ये सर्व तीर्थात महान आहे कारण सर्व वस्तू ह्या कोणत्याही बाजारातून विकत घेता येतात तेही पुन्हा पुन्हा पण एक वेळा आई वडिल गेले ना या जीवनात ते कोणत्याच बाजारात पुन्हा मिळत नाही.म्हणून आई वडिलांची सेवा करणे हे महान कार्य आहे.असे आपल्या राष्ट्रीय प्रबोधनकार ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे माऊली दास यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले मांगलादेवी या गावी तालन परिवाराने वडिलांची सेवा करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर चौदावीच्या कार्यक्रम निमित्याने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांचे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले. आपले आई व वडील यांची लहान मुलाने खूप सेवा केली .स्वर्गीय अवधूतराव तालन यांची प्रवीण व दीपाली या पुत्र सुनेने खूप सेवा केली म्हणून त्यांचा सपत्नीक शाल देऊन कीर्तनाच्या वेळी सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे, रविपाल महाराज , काळंमेघ भाऊसाहेब उपस्थित होते .

ग्रामगीतचार्य हनुमंत ठाकरे यांनी म्हटले की समाजाने अशा आदर्श घेऊन आपल्या आई वडिलांची सेवा करावी म्हणजे आई वडिलांचे शेवटी हाल होणार नाही व वृद्धाश्रमाची आवश्यकता पडणार नाही म्हणून भक्त पुंडलिका सारखे मुल निर्माण झाले तर चांगले संस्कार ज्या घरात आहे .तेथे आई वडिलांची सेवा होते.असे ग्रामगीताचार्य म्हणाले हार्मोनियमवर शुभम सगळे व तबल्यावर सात सांगत गोपाल ठाकरे हे होते. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवंदना घेण्यात आली .















