श्रीराम शिक्षण संस्थेच्या च्या विद्यार्थिनीची विभागीय स्तरावर निवड

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

श्रीराम शिक्षण संस्थेच्या श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय व स्व. नंदलाल लोया कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे येथील कु. मनस्वी गिरोली या विद्यार्थिनीची अमरावती येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भालाफेक या खेळात विभाग स्तरावर निवड झाली आहे तसेच १९ वर्ष वयोगटांमध्ये डॉज बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यालयातील चमूने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केले आहे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे

या विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण अडसड, उपाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष संजय राठी सचिव घनश्याम मेश्राम श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय व नंदलाल लोया कन्या विद्यालयाच्या प्राचार्य व माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत प्रशिक्षक व सहाय्यक शिक्षक संजय बाळापुरे यांनी मनस्वीचे व डॉज बॉल चमुचे शाळेत स्वागत व अभिनंदन केले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पुढील खेळातील यशस्वी करीता सर्वानी शुभेच्छा दिल्या

veer nayak

Google Ad