स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

0
96
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, दि. १३ मे स्कूल ऑफ स्कॉलर्स या नामांकित शैक्षणिक संस्थेने सी.बी.एस. ई. २०२४ – २५ दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप सोडत १००% निकाल आणि ७७.४९% सरासरी सह घवघवीत यश संपादन केले आहे. निकाल जाहीर होताच शाळेत जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. यावर्षी ८ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले असून त्यांनी शाळेच्या गुणवत्तेचा आलेख अधिक उंचावला आहे.
विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे श्लोक राधेश्याम चांडक या विद्यार्थ्याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी
1. अथर्व किशोर काळे – ९७.४०% (प्रथम क्रमांक)
2. राम मनीष राय – ९७.००% (द्वितीय क्रमांक)
3. श्लोक राधेश्याम चंडक – ९५.६०% (तृतीय क्रमांक)
4. दिया पवन पनपालीया – ९५.४०%
5. अदीबा वसीम शेख – ९३.६०%
6. सम्यक व्यंकट कांबळे – ९३.००%
7. शर्वरी रोशन तायडे – ९१.००%
8. कृतिका विलास राठोड – ९०.८०%
या गुणवंत विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर उत्तुंग यश मिळवले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत सर्वांगीण प्रगतीचे उत्तम उदाहरण घडवले आहे.
हा उज्ज्वल निकाल हे विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे समर्पण, पालकांचे समर्थन आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे फलित आहे.

शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून या प्रवासात साथ देणाऱ्या पालकांचे आणि शिक्षकांचे विशेष आभार मानले. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

veer nayak

Google Ad