धामणगाव रेल्वे (२२ एप्रिल २०२५) – स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे आज ‘आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर आधारित पालक कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. “Healthy Homes, Happy Families: Practical hygiene habits every parent should know” या मुख्य विषयावर डॉ. मनिष अप्तुरकर (M.B.B.S., D.C.H.) यांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. मनिष अप्तुरकर, हे सर्वज्ञ हॉस्पिटल, धामणगाव रेल्वे येथील सुप्रसिद्ध बालरोग व नवजात तज्ज्ञ असून त्यांनी आपल्या सखोल ज्ञानाच्या माध्यमातून पालकांना मुलांच्या आरोग्याची निगा, स्वच्छतेच्या सवयी व त्याचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे संचालन इंग्रजी विषयाच्या शिक्षिका पूजा शेळके यांनी सुंदरपणे पार पाडले. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी पालकांना उद्देशून प्रेरणादायी भाषण केले व या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले. SOS Cubs विभागाच्या प्रमुख शबाना खान यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि संयोजन केले.
कार्यक्रमामध्ये शाळेतील शिक्षकवृंदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच उपस्थित पालकांनीही कार्यक्रमातील मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने करण्यात आला.