धामणगाव रेल्वे:-
मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम आणि शिक्षिका राणी रावेकर मॅडम यांनी रक्षाबंधनविषयी माहिती सांगितली. दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिण्यातील नारळीपौणिमेला येतो रक्षाबंधन म्हणजे बहिणभावाच्या नात्याचे प्रतिक आहे रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीची रक्षा करणे होय असे विद्यार्थ्यांना समजावुन सांगितले मुलींनी औक्षण करून मुलांच्या हाताला राख्या बांधल्या आणि मुलांनी चाॅकलेट स्वरूपात भेटवस्तु दिल्या.
त्यानंतर केजी 2 ते वर्ग 2 री च्या विद्यार्थ्यांना घेवुन पोलिस स्टेशनला भेट देण्यात आली आणि तेथे रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तेथील पी.आय. गिरिश थाठोड सर आणि महिला पोलिस कर्मचारी यांना विद्यार्थ्यांनी हाताने बनविलेल्या राख्या बांधण्यात आल्या तेथील स्टाफने विद्यार्थ्यांना मिठाई दिली व पी.आय.गिरिश थाठोड सर, पी.एस.आय.विष्णु राठोड सर,पी.एस.आय.विकास राठोड सर,पी.एस. आय.सोनाली राठोड मँडम,ए.एस.आय.धनंजय झाटुले सर,एच.सी.पडोले सर, एच.सी.अरूण पवार सर, एन.पी.सी.सागर कदम सर, एन.पी.सी.संदिप तिरपुडे सर, एच.सी.अतुल पाटिल सर, आणि एन.पी.सी. वैद्य सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पोलिस हा समाजाचा अविभाज्य अंग आहे आणि त्यांच्या कर्तव्याच्या माध्यमातुन ते आपली रक्षा करतात असे मुल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्रि प्रायमरी हेड शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांनी सहकार्य केले.