” स्कूल ऑफ स्कॉलर्सची आराध्या अनिल बरेठिया आंतरराष्ट्रीय शिवस्तोत्र स्पर्धेत तिसरी”*

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्कूल ऑफ स्कॉलर्स धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थिनी आराध्या अनिल बरेठिया हिने आंतरराष्ट्रीय शिवस्तोत्र पठण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘अभिव्यक्ती’ संस्थेच्या वतीने या आंतरराष्ट्रीय शिवस्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध राज्यांतील तसेच परदेशातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिवस्तोत्राचे अचूक व स्पष्ट उच्चार, लयबद्धता, पाठांतर, भावपूर्ण सादरीकरण आणि आत्मविश्वास या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले.

 

आराध्याने कोणताही मजकूर न पाहता आत्मविश्वासपूर्वक व प्रभावी उच्चारांसह ‘शिवतांडव स्तोत्रा’चे सादरीकरण केले. तिच्या नेटक्या, स्पष्ट आणि भावपूर्ण पठणामुळे उपस्थित परीक्षक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत परीक्षकांनी तिला तृतीय क्रमांक प्रदान करून पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपप्राचार्य तुषार रेवतकर, प्री प्रायमरी हेड शबाना खान आणि प्रशासकीय अधिकारी प्रितेश जणवाडे यांनीही तिचे अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी तिच्या जिद्द, परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आराध्याच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.

veer nayak

Google Ad